भाजपकडून राज ठाकरेंना व्यंग्यचित्राच्या माध्यमातून चिमटा!

वृत्तसंस्था
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

आज निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपकडून एक व्यंग्यचित्र प्रसिद्ध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकप्रकारे चिमटा काढण्यात आला. 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक जिंकण्यासाठी तयारी केली जात आहे. मात्र, आज निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपकडून एक व्यंग्यचित्र प्रसिद्ध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकप्रकारे चिमटा काढण्यात आला. 

2004 च्या निवडणुकीवेळी राज ठाकरे शिवसेनेत होते. मात्र, काही कारणास्तव राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांचा नवा पक्ष मनसेची स्थापना केली. पक्ष स्थापनेनंतर मनसेकडून स्वबळावर निवडणुका लढविण्यात आल्या. तसेच 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारवर निशाणा साधला होता.

त्यानंतर आता भाजपने राज ठाकरे यांना चिमटा काढत 'आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार? अशा आशयाचे व्यंग्यचित्र काढून ट्विटवरून चिमटा काढला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP make Fun of Raj Thackeray with Cartoon