परप्रांतियांवरून नवा वाद, भाजपा आमदाराची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार

CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackerayeSakal

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) यांनी परप्रांतियांची नोंद ठेवावी लागेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात समतानगर पोलिस ठाण्यात तक्रार () दाखल केली आहे. याबाबत स्वतः भातखळकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

CM Uddhav Thackeray
अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी

साकीनाका बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयात गृहविभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो आणि कोठे जातो, याची नोंद ठेवा असे आदेश दिले होते. त्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आरोप होतात. महिलेने आरोप केले की त्यांना तुरुंगात टाकले जाते. मंत्रिमंडळात आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे, आपल्या पक्षाचे नेते संजय राठोड हे परप्रांतीय आहेत का? असा परखड सवाल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

सेनेच्या कितीतरी पदाधिकाऱ्यांवर आरोप आहेत आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. ते काय परप्रांतिय आहेत का? मुख्यमंत्र्यांना ते दिसत नाही का? मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य १०० टक्के घटनेच्या विरोधी आहे. बलात्काराच्या चौकशीसंबंधी बैठक घेताना परप्रांतीय लोकांवर नजर ठेवावी लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात. बलात्कार करणाऱ्याच्या बाबतीत त्याचा धर्म कोणता, जात कोणती, त्याचा प्रांत कोणता हे बघून आरोपी ठरवणार का? असा सवाल भातखळकरांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला हात घातला असून महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. माता भगिनींची टिंगल टवाळी करणे आणि त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयात झालेल्या गृह विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com