Gopichand Padalkar : सतत शरद पवारांवर टीका केल्याने राष्ट्रवादी आक्रमक; पडळकरांविरोधात घेतली पोलिसांत धाव

शरद पवार ही राज्याला लागलेली कीड आहे, अशा आशयाचं विधान त्यांनी नुकतंच केलं होतं.
case filed against bjp mla gopichand padalkar over critisizing sharad pawar
case filed against bjp mla gopichand padalkar over critisizing sharad pawar Sakal

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. याच संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नुकतंच पडळकर यांनी शरद पवार राज्याला लागलेली कीड आहे, अशा आशयाचं एक विधान केलं. त्यामुळे राष्ट्रवादीने आता पडळकरांनी टीकेची पातळी घसरल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांवर वारंवार केल्या जाणाऱ्या या टीकेमुळे राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेतली आहे.

case filed against bjp mla gopichand padalkar over critisizing sharad pawar
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ठरले संकटमोचक!, महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली

पुणे जिल्ह्यातील इंदापुरमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी 'शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ही कीड मुळापासून काढून टाकावी लागेल', असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याच्या विरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. राज्यात आणखी काही ठिकाणीही राष्ट्रवादीकडून तक्रार केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com