गेल्या वर्षी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या राम कदमांनी यावर्षी दहीहंडी रद्द केली

गेल्या वर्षी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या राम कदमांनी यावर्षी दहीहंडी रद्द केली

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी यावर्षी दहीहंडी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती राम कदम यांनी दिली. दहीहंडीचा उत्सव रद्द करून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय राम कदम यांनी घेतला आहे. त्यांनी इतर दहीहंडी आयोजकांनाही सोहळा रद्द करण्याचे आवाहन केले आहे. तसेच हा सोहळा साधेपणाने साजरा करत संपूर्ण निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये  देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

गेल्या वर्षी राम कदम यांनी आयोजित केलेला दहीहंडीचा सोहळा वेगळ्याच कारणासाठी गाजला होता. उपस्थित गोविंदांसमोर बोलताना त्यांनी ‘एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. राम कदम यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी जोरदार टीका झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com