"शिंदे CM होताच भाजपचे ८५ आमदार बंडाच्या तयारीत..." ; अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट - Maharashtra Budget Session 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"शिंदे CM होताच भाजपचे ८५ आमदार बंडाच्या तयारीत..." ; अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

"शिंदे CM होताच भाजपचे ८५ आमदार बंडाच्या तयारीत..." ; अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ८० भाजप आमदार बंड करणार होते. देवेंद्र फडणवीस यांनी हे बंड थांबवले. तसेच ८ महिने उलटून गेले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.

भाजपच्या सर्व आमदारांना वाटत होत की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार. त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मी भेटायला गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले अजितजी ऐ क्या हुवा, अक्षरक्षा असं वाक्य त्यावेळी माझ्या कानावर आलं. मी मंत्रिमंडळात जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावेळी कुणाच्या डोळ्याच पाणी आलं हे गिरीश महाजन यांना चांगल माहित आहे, असे अजित पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले, "त्यावेळी काय करायचं अशी चर्चा भाजप आमदारांमध्ये झाली. काही जण म्हणाले ८० - ८५ आमदारांनी बंड करायचं का?. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगतिल असं काही करु नका. त्या दोघांना (अमित शाह-नरेंद्र मोदी) कळल तर आपला सुपडा साफ होईल, असे फडणवीसांनी सांगितले. वरून आदेश आले आहेत सर्वांनी आदेशाचे पालन करण्याचे फडणवीस म्हणाले."

सरकार स्थापन झालं, त्यावेळी दोघांनी राज्य चालवले. ते म्हणत होते आम्ही खंबीर आहोत. त्यानंतर मंत्रिमंडळ वाढलं. मात्र ८ महिने झाले तरी पूर्ण मंत्रिमंडळ झाले नाही. महिलांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.