रात्रीत ठरली भाजपाची रणनीती; वाटून दिली विधानपरिषदेची जबाबदारी

याआधी राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांच्या खांद्यावर होती.
Pravin Darekar Ashish Shelar Girish Mahajan
Pravin Darekar Ashish Shelar Girish MahajanSakal

राज्यात सध्या निवडणुकांचं वारं वाहत आहे. राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपा आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून परतताच भाजपाने तातडीची बैठक घेत हा निर्णय घेतला आहे. (Maharashtra MLC Election 2022)

Pravin Darekar Ashish Shelar Girish Mahajan
भाजपाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर; पंकजा मुंडेंचा पत्ता कट

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने रणनीती आखली आहे. यापूर्वी राज्यसभेची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे दिली होती. मात्र आता विधान परिषदेसाठी निवडणुकीची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी आता आशिष शेलार, गिरीश महाजन (Girish Mahajan), प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे तिघेही संपूर्ण जबाबदारी घेणार आहेत.

Pravin Darekar Ashish Shelar Girish Mahajan
शेवटच्या क्षणी फडणवीसांची खेळी; सदाभाऊंचा विधान परिषदेसाठीचा अर्ज मागे

भाजपाने विधान परिषदेत पाच उमेदवारांना संधी दिली आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना भाजपाने तिकीट दिलं आहे. भाजपाने अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनाही संधी दिली होती. मात्र ऐनवेळी उमेदवारी अर्ज परत घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com