जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या परिचारकांचे निलंबन मागे

Prashant Paricharak
Prashant Paricharak

मुंबई : भारतीय जवानांच्या पत्नींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे सोलापूरचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन आज (गुरुवार) विधान परिषदेत मागे घेण्यात आले.

आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नींच्या चारित्र्या संदर्भात निवडणूक प्रचार सभेत बेताल वक्तव्य केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. भोसे (ता.पंढरपूर) येथील सभेत ते म्हणाले होते, की पंजाब मधला जवान असतो सीमेवर आणि त्याची बायको इकडे बाळंतीण होते. तुम्हाला मुलगा झाला अशी त्याला तार येते. वर्षभर तो गावाकडे गेलेला नसतो आणि तिथे तो पेढे वाटतो. लोक म्हणतात, काय झालं तो सांगतो मला मुलगा झाला. असे सगळे राजकारण आहे. या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.  

परिचारक यांचे 2017 मध्ये दीड वर्षांचे निलंबन घालण्यात आले होते. पण, आता निवडणुकीच्या तोंडावर हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. आज विधान परिषदेत गोंधळातच सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. १७ जूनला उर्वरित अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे. परिचारक यांच्या निलंबनानंतर संतप्त रावते यांनी सभापती रामराजेंच्या दालनात जाऊन आक्षेप नोंदवला, तर विनायक मेटेंनाही लॉबीत जाऊन जाब विचारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com