Sambhajinagar News : 'धाराशिव'ला मोदी सरकारचा हिरवा कंदील, औरंगाबादबद्दल मात्र… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP modi Govt in Bombay High Court on renaming of Osmanabad and Aurangabad maharashtra news

Sambhajinagar News : 'धाराशिव'ला मोदी सरकारचा हिरवा कंदील, औरंगाबादबद्दल मात्र…

बऱ्याच दिवसांपासून मागणी होत असलेल्या उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराबद्दल केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात महत्वाची माहिती दिली आहे. उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यास हरकत नाही अशी माहिती केंद्र सरकराने केंद्र सरकराने हायकोर्टात दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याची प्रक्रिया विचाराधिन असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा असलेलं औरंगाबाद शहराचं नामांतर अजूनही वेटिंगवर असल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारकडून ही महत्वाची माहिती देण्यात आली आहे. आधी ठाकरे सरकारने आणि नंतर शिंदे भाजप सरकारने दोन्ही शहरांच्या नामांतराचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर आता केंद्र सरकारने उच्च न्यायालयात सांगितले की, उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यास मान्याता दिली आहे. परंतु औरंगाबाद चे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास मंजुरी देण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.