सत्ता परिवर्तनाच्या खेळीमागे गुजरातमधील महाराष्ट्राचा खानदेशी माणूस

शिवसेनेचे आमदार फोडून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनासाठी भारतीय जनता पक्षातर्फे ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्यात येत आहे.
C R Patil
C R Patilesakal

जळगाव : शिवसेनेचे आमदार फोडून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनासाठी भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) ‘ऑपरेशन लोटस’ (Operation Lotus) राबविण्यात येत आहे. त्याचे मुख्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष व नवसारीचे (सुरत)चे खासदार सी.आर.पाटील हे आहेत. त्यांचे मूळ कनेक्शन जळगाव जिल्ह्याशी आहे.

शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले. सर्व आमदार रातोरात सुरत येथील ली मेडीयन हॉटेल येथे दाखल झाले आहेत. या सर्व आमदारांची महाराष्ट्रातून थेट गुजरात येथील हॉटेलमध्ये राहण्याची जबाबदार गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार सी.आर. ऊर्फ चंद्रकांत रघुनाथ पाटील यांनी घेतली आहे. खासदार पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनीच या बंडाला खऱ्या अर्थाने चालना दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील व पारोळा येथील शिवसेना आमदार चिमणराव पाटील यांचे खासदार पाटील यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यांची वेळोवेळी भेट होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे दोन्ही आमदारही सुरत येथे आहेत.

C R Patil
एकनाथ शिंदे यांच्या बंडात खानदेशातील आमदार

खासदार सी.आर. पाटील हे मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत हे त्यांचे मूळ गाव आहे. याच तालुक्यात त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले आहे. पुढे ते कामानिमित्ताने गुजरात येथे गेले. त्या ठिकाणी त्यांनी नवसारी (गुजरात) येथे त्यांनी व्यवसाय सुरू केला. त्या माध्यमातून त्यांची ओळख झाली, त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पुढे ते नवसारी महापालिकेचे नगरसेवक व महापौर झाले, त्यानंतर आमदार व नवसारीचे खासदार झाले. आजही ते खासदार आहेत.

C R Patil
शिवसेना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी अन भाजप कार्यालयासमोर बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या ते विश्‍वासातील आहेत. ते सद्या गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आजही त्यांचा जळगावशी संबंध आहे. पिंप्री अकाराउत येथे त्यांची शाळा तर जळगाव येथे आदर्श नगरात त्यांचे घर आहे. महाराष्ट्रातील सत्तातंरासाठी ‘ऑपरेशन लोटस’ ची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपविली आहे. विशेष म्हणजे ते यशस्वीपणे ती राबवीत आहेत. महाराष्ट्रातील सत्तांतरासाठी महाराष्ट्राच्या भूमीतील गुजरातमधील कर्तृत्वानं मराठी माणूसच फिल्डींग लावत आहे. हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com