भाजप आमदार, नगरसेवकांचे महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

मागील काही दिवस पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भाजपचे मुंबईतील सर्व आमदार आणि नगरसेवक मुख्यमंत्री सहायता निधीला एक महिन्याचे वेतन देणार आहेत.

मुंबई - मागील काही दिवस पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भाजपचे मुंबईतील सर्व आमदार आणि नगरसेवक मुख्यमंत्री सहायता निधीला एक महिन्याचे वेतन देणार आहेत.

मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारीदेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला आपापल्या परीने साहाय्य देणार आहेत. देशात कोठेही संकट आले की मुंबईकर नेहमीच मदतीसाठी पुढाकार घेतात. त्यामुळे आता मुंबईतील जनतेनेही पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार मदत करावी, असे आवाहन लोढा यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Corporator Salary Flood Affected