मोदींच्या भाषणातील शिवछत्रपतींच्या संदर्भाबाबत उदयनराजेंचे ट्‌विट, काय म्हणाले वाचा

सिद्धार्थ लाटकर
Friday, 7 August 2020

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाकडून मैदानात उतरलेल्या उदयनराजेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा शहरात भव्य सभा घेतली. होती. या सभेतही पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीत आल्याचा आनंद व्यक्त केला होता.

सातारा : अयोध्या येथे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यस्थापनेचा आवर्जुन उल्लेख केला. ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या स्वराज्याच्या कार्यात अग्रभागी होते, अगदी त्याचप्रमाणे देशातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने राम मंदिराच्या उभारणीचे पुण्य कार्य होऊ घातले आहे,' असं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उल्लेख केल्याने भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि शिवछत्रपती घराण्याचे 13 वे वशंज खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या स्वतःच्या समाज माध्यमांवरील अकौंटवर भावना व्यक्त केली आहे.
ब्रेकिंग : जाणुन घ्या, कोयना धरणातून केव्हा साेडले जाणार पाणी 
 

श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवछत्रपतींचा व मावळ्यांचा केलेला उल्लेख तमाम देशवासियांसमोर केलेला आपल्या महाराष्ट्राचा सन्मान व गौरव आहे, अशी भावना उदयनराजेंनी आपल्या फेसबुक पेजवर तसेच ट्‌विटरवर व्यक्त केली आहे. माेदींच्या भाषणाचा व्हिडिआे देखील उदयनराजेंनी पाेस्ट केला आहे.

लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून विजय मिळविला होता. त्यानंतर काही दिवसांतच उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीची वाट चोखळली होती. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाकडून मैदानात उतरलेल्या उदयनराजेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा शहरात भव्य सभा घेतली. होती. या सभेतही पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीत आल्याचा आनंद व्यक्त केला होता. साताऱ्याच्या भुमीत येऊन पावन झाल्याचे म्हटले होते.

तुमचा मुलगा/मुलगी दहावी पास झालेत, मग हे वाचा

अयोध्या येथे देखील पंतप्रधान मोदी यांनी भुमिपूजनानंतर केलेल्या भाषणात, माझे येथे येणे स्वाभाविकच होते. आज इतिहास रचला जात आहे. कन्या कुमारीपासून क्षीर भवानिपर्यंत, सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत, आणि लक्ष्यद्विपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय आहे. एवढेच नाही, तर "राम काज कीन्हे बिनु मोहि कहां विश्राम", असे म्हणत, शतकांची प्रतीक्षा आज संपत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे. अनेक वर्षे रामलला टेंटमध्ये होते. मात्र, आता भव्य मंदिर उभारले जात आहे, असं नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं होतं.

भारत भक्त...राम भक्तांना PM मोदींकडून कोटी कोटी शुभेच्छा!
 
त्याच वेळीस पंतप्रधान मोदींनी ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या स्वराज्याच्या कार्यात अग्रभागी होते, अगदी त्याचप्रमाणे देशातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने राम मंदिराच्या उभारणीचे पुण्य कार्य होऊ घातले आहे,' असे नमूद केले. मोदींनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उल्लेख केल्याने प्रत्येक शिवप्रेमी आज त्यांच्या मोबाईलवर, फेसबुकवर तसेच विविध समाज माध्यमांवर मोदींचे ते भाषण पोस्ट करीत आहे. खासदार उदयनराजेंनी माेदींच्या भाषणाचा व्हिडिआे पाेस्ट केल्याने शिवप्रेमींमध्ये चैतन्य पसरले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Udayanraje Bhosale Tweets On PM Narendra Modi Speech in Ayodhya