Maharashtra Politics : 'मच्छर मारण्यासाठी धमकी देण्याची गरज नाही'; भाजप नेत्याचं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Nitesh Rane reaction on death threat to sharad pawar and sanjay raut Maharashtra politics

Maharashtra Politics : 'मच्छर मारण्यासाठी धमकी देण्याची गरज नाही'; भाजप नेत्याचं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील दोन बड्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसून येत आहेत. यादरम्यान भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.

राणे काय म्हणालेत...

नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना मच्छर मारण्यासाठी धमकीची गरज नाही असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, "आदरणिय पवार साहेबांची सगळी काळजी घेण्याची जबाबदारी ही आमच्या सरकारची आहे. तुम्ही ज्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेत आहात… आता मच्छर मारण्यासाठी काही कोणाला धमकी देण्याची गरज नाही. पायाच्या खाली… बुट हलवला तरी तो मरतो. त्याला काही धमकीचा विषय नाही". दरम्यान भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली आहे. त्यांना फोनकरून अशा प्रकारची धमकी देण्यात आली.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना देखील ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचा दाभोळकर होणार अशा शब्दात शरद पवारांना धमकावण्यात आले आहे.

फडणवीस काय म्हणाले?

राजकीय पातळीवर मतभेद असतील पण मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी येणं खपवुन घेणार नाही. कायद्याप्रमाणे पोलिस निश्चित कारवाई करतील. सभ्येतेच्या मर्यादा ओलांडणे खपवुन घेणार नाही. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.