आता मेगाभरतीतील नेत्यांना भाजप ठेवतोय दूर!

वृत्तसंस्था
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

विखे-पाटील पुन्हा काँग्रेसच्या संपर्कात ?

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध पक्षातील नेतेमंडळींनी आपला पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यातील अनेकांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, यापैकी अनेक नेत्यांना खुद्द जनतेनेच नाकारले. तर विजयी झालेल्या नेत्यांना भाजप दूर ठेवत असल्याचे सध्या दिसत आहे. 

भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. यामध्ये उदयनराजे भोसले, मधुकर पिचड, गणेश नाईक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह नारायण राणे यांचा समावेश आहे. मात्र, आता या नेत्यांना निकालानंतर भाजपमध्ये फारसं महत्त्व मिळत नसल्याचे चित्र आहे.

अजित पवारांना कोणते पद मिळणार? बारामतीकरांना उत्सुकता

विखे-पाटील पुन्हा काँग्रेसच्या संपर्कात?

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे-पाटील हे पुन्हा काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, त्यानंतर खुद्द विखे-पाटील यांनी हे वृत्त खोडून काढले. 

चर्चा योग्य दिशेने सुरु झाली : उद्धव ठाकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP not involve Radhakrishna Vikhe Patil and other leaders to decision making