भाजपच्या जागांवर उमेदवारांची चाचपणी

मृणालिनी नानिवडेकर
रविवार, 3 जून 2018

मुंबई - यापुढची प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप लढवीत असलेल्या लोकसभा मतदारसंघांत उमेदवारांचा शोध घेण्याची मोहीम शिवसेनेने सुरू केली आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विभागप्रमुख, संपर्कप्रमुख यांनी आपापल्या भागांतील संभाव्य उमेदवारांची नावे तयार करावीत, तसेच त्यांच्या जिंकण्याच्या क्षमतांचा लेखाजोखा तयार ठेवावा, असे ‘मातोश्री’वरून कळविण्यात आले आहे. १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळीतील एनएससीआय संकुलात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. 

शिवसेनेने आक्रमक पवित्रा धारण केल्यामुळे भाजप सध्या हवालदिल झाला आहे. शिवसेनेशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागले तर ते कठीण असेल, असे एका ज्येष्ठ नेत्याने कबूल केले.  

Web Title: BJP Politics shivsena candidate