Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीकडे मागितली मदत ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Ram Kadam on Shivaji Park Dasara Melava Shivsena

Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीकडे मागितली मदत ?

दसरा मेळाव्याला गर्दी दाखवण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस मदत मागितली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवाजी पार्क मैदान भरणार आहेत. सत्य काय आहे हे पेंग्विन सेनेचे नेते महाराष्ट्राला सांगणार का?, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.(BJP Ram Kadam on Shivaji Park Dasara Melava Shivsena )

दादरच्या शिवाजी पार्कात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच पत्रकार परिषद घेत राज्यभरातील शिवसैनिकांना शिस्तीने आणि वाजत-गाजत येण्याचे आवाहन केले आहे.

याशिवाय, यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक करण्याबाबत शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, राम कदम यांनी दसऱ्यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेवर टीका केलीय.

काय म्हणाले राम कदम?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवाजी पार्क मैदान (Shivaji Park) भरणार आहेत. सत्य काय आहे हे पेंग्विन सेनेचे नेते महाराष्ट्राला सांगणार का?, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे. यासंदर्भात ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे सर्व नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आता शिवाजी पार्कच मैदान भरायला कोणीच नाही उरलेलं. अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये वसुली वसुली आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पडलेला विसर हे सर्व शिवसेनेच्या सच्चा कार्यकर्त्याच्या लक्षात आलं आहे. त्याच्यामुळे तो देखील शिंदेंसोबत आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २० तास काम करतात दर दुसऱ्या ठिकाणी अडीच वर्ष घराच्या बाहेर कधी पडले नाहीत. मंत्रालयाच पाच वर्ष गेले पण तीनवेळी लॉबीतूनच परत आले. हे सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्याने पाहिलं आहे. लोक भाषणाला सॅल्यूट नाही करत रिझल्टला सॅल्यूट करतात. आणि रिझल्य देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात. रात्री २ किंवा ३ वाजता लोकांना भेटतात. पण अडीत वर्षात मुख्यमंत्री भेटले का ? असाल सवाल त्यांनी उपस्थित केला. ९ कॅबिनेट मंत्री सोडून गेले आहेत. त्यामुळे कोणीही नसल्याने दसरा मेळ्याव्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घेणार असल्याचे राम कदम यांनी म्हटलं आहे.