राज्य सहकारी बँक गैरव्यवहारात सत्ताधारी भाजपचेही नेते

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. 

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. 

मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. नेते व अधिकारी मिळून 300हून अधिक व्यक्तींविरोधात ही तक्रार देण्यात आली. त्यामुळे सर्वच पक्षांच्या 76 नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अजित पवारांसह आनंदराव अडसूळ आदींसह 76 बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांचा लाभार्थी म्हणून मूळ तक्रारीत उल्लेख करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गुन्हा दाखल झालेल्या भाजप नेत्यांमध्ये निलेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, मदन पाटील, सिद्रामाप्पा आलुरे, सरकार जितेंद्रसिंह रावळ (मंत्री जयकुमार रावळ यांचे वडिल), पृथ्वीराज देशमुख (भाजप विधानपरिषद सदस्य), पांडुरंग फुंडकर (दिवंगत मंत्री), विलासराव जगताप, शिवाजीराव नलावडे यांचा समावेश आहे.

राजकीय नेत्यांनी नियमाचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल होऊनही गुन्हे न दाखल केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले. शिखर बॅंकेच्या 46 संचालकांसह 34 जिल्हा बँकांच्या संचालकांचा यात समावेश आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केली. राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतील संस्था-व्यक्तींना नियमबाह्यपणे कर्जे दिल्याने बॅंक अडचणीत सापडली आणि त्यावर प्रशासक नेमणे रिझर्व्ह बॅंकेला भाग पडले. या संदर्भात नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही गुन्हा नोंदवण्यात आला नाही, त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली होती. या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 471, 120(ब) सह लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 13(1) अ व 13(1) क अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्हा दाखल झालेले नेते...
माणिकराव पाटील, निलेश नाईक, विजयसिंह मोहित पाटील, अजित पवार, दिलीप देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, शिवम जाधव, गुलाबराव शेळके, माधवराव पाटील, सिद्रामाप्पा आलुरे, विलासराव पाटील, रवींद्र डुंगरकर, अरविंद पोरेडीवार, सदाशिवराव मंडलिक, यशवंतराव गडाख, लिलावती जाधव, मधुकर झुंजाळ, प्रसाद तनपुरे, आनंदराव चव्हाण, सरकार जितेंद्रसिंह रावल, बाबासाहेब वसदे, नरेशचंद्र ठाकरे, नितीन पाटील, किरण देशमुख, तानाजीराव चोरगे, दत्तात्रय पाटील, राजेंद्र जैन, तुकाराम धिंगोळे, मिनाक्षी पाटील, रवींद्र शेट्ये, पृथ्वीराज देशमुख, आनंदराव अडसुळ, राजेंद्र पाटील, अंकुश पोळ, नंदकुमार धोटे, जगन्नाथ पाटील, सुरेश देशमुख, उषा चौधरी, संतोषकुमार कोरपे, जयंत पाटील, देवीदास पिंगळे, एन. डी. कांबळे, राजवर्धन कदंबाडे, गंगाधरराव देशमुख, रामप्रसाद कदम, धनंजय दलाल, जयंतराव आवळे, वसंतराव शिंदे, डी. एम. माहोळ, पांडुरंग फुंडकर, ईश्वरलाल जैन, वसंतराव पवार, राजन तेली, दिलीप सोपल, चंद्रशेखर घुले-पाटील, विलासराव जगताप, अमरसिंह पंडीत, योगेश पाटील, शेखर निकम, श्रीनिवास देशमुख, रवींद्र देशमुख, विलासराव शिंदे, यशवंत पाटील, बबनराव तायवडे, अविनाश अरिंगळे, रजनी पाटील, लक्ष्मण पाटील, माणिकराव कोकाटे, राहुल मोटे, शिवाजीराव नलावडे, सुनील फुंडे, शैलजा मोरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP, Sena leader also include in State Co-operative Bank scam