BJP-Shinde Camp: भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी; राऊतांची भविष्यवाणी खरी ठरणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Shinde Camp jat water crisis Vilasarao Jagtap Eknath Shinde Devendra Fadnavis

BJP-Shinde Camp: भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी; राऊतांची भविष्यवाणी खरी ठरणार?

राज्यात गेल्या काही दिवसांपाासून महाराष्ट्रा आणि कर्नाटक सीमावादाचा मुद्याने जोर धरला आहे. अशातच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली येथील जत तालुक्यात पाणी प्रश्नावर तोडगा काढत दुष्काळी भागात पाणी सोडले. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या घोषणेवरुन भाजप शिंदे गटात आता वादाची ठिणगी पडली आहे. (BJP Shinde Camp jat water crisis Vilasarao Jagtap Eknath Shinde Devendra Fadnavis )

जतच्या म्हौसाळ विस्तारित पाणी योजनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा दिशाभूल करणारी असल्याची गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे.

जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांना पाणी मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत योजनेसाठी दोनशे कोटींचा तातडीचा निधी मंजूर करण्यात आला.

मात्र, भाजपच्याच नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर आक्षेप घेतला आहे.

काय म्हणाले विलासराव जगताप?

म्हैसाळ विस्तारित पाणी योजनेसंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये म्हैसाळचे जलसंपदा मंत्री, म्हैसाळचे अधिकारी, अर्थमंत्री यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. म्हणजे ही बैठक म्हैसाळ योजनेची नव्हती. त्यामुळे म्हैसाळ योजनेसंदर्भात केलेली घोषणा ही खोटी आहे. कामासाठी 200 कोटी रुपये त्यांनी दिले आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे.

परंतु, विस्तारित योजनेबाबत केलेले वक्तव्य साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. जानेवारीत काम सुरू करू, असे दिलेले आश्वासन हे धादांत खोटे आहे, असे टीकास्त्रच जगताप यांनी शिंदे फडणवीस सरकारवर सोडले.

जतच्या सीमावर्ती भागातील 40 गावावर दावा करणाऱ्या कर्नाटकने बुधवारी तुंबची योजनेतून पाणी जत पूर्व भागात सोडले आहे. तुंबची योजना तातडीने सुरू करत ते यतनाळ येथील ओडापात्रातून सोडण्यात आले. यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात ओवरफ्लो झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जत येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित करत विस्तारीत म्हैसाळ योजना युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे आदेश दिले.

भाजप नेत्यानेच राज्यसरकारला घरचा आहेर दिल्याचे पाहून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणा आल आहे. कारण, नुकतचं संजय रऊत यांनी भाजपमधील एका मोठ्या गटाचे भांडण हे शिवसेना ठाकरे गटाशी राहणार नसून ते शिंदे आणि त्यांच्या गटासोबत निर्माण होणार आहे. असं वक्तव्य केल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात राऊतांच भविष्य खरं ठरणार? अशी चर्चा रंगली आहे.