भाजप-शिवसेनेचे "जागते रहो' 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर सत्तेचा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये अटीतटीचा सामना रंगलेला असताना, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी "जागते रहो'चे धोरण अवलंबले आहे. मतदानाच्या अगोदर जाहीर प्रचाराचे तीनच दिवस शिल्लक राहिल्याने या दोन्ही पक्षांतील संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हे आहेत. पोलिस प्रशासनही डोळ्यांत तेल घालून सज्ज आहे. 

अत्यंत टोकाच्या व विखारी प्रचारामुळे मुंबई महापालिकेच्या आखाड्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. नेत्यांचे आक्रमक बोल व कार्यकर्त्यांचा उत्साह; यामुळे निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडेल यासाठीची दक्षता घेतली जात आहे. 

प्रचाराचा समारोप रविवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता होणार असल्याने सभा व रोड शोचे असंख्य कार्यक्रम होणार आहेत. अंधारात "अर्थपूर्ण' प्रचार होणार नाही यासाठी कार्यकर्ते करडी नजर ठेवत आहेत. शिवसेनेच्या शाखांवर रात्रभर कार्यकर्ते गटागटाने थांबत असल्याचे दिसते. भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करून प्रचाराला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आहे, तर शिवसेनेच्या वतीनेही मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. भाजपच्या सत्ता व ताकदीचा सामना करण्याचे आव्हान शिवसैनिकांसमोर आहे.

Web Title: bjp shiv sena