भाजप-शिवसेना सत्तेत येऊ नये म्हणून संघटना बांधतोय - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

औरंगाबाद : ज्यांच्या हाती महाराष्ट्राने सत्ता दिली त्या भाजप-शिवसेना सरकारनेच राज्याची विल्हेवाट लावली. भाजप सरकार इव्हीएम मशीनचा वापर करून निवडणूका लढवत आहे. अनेक ठिकाणी इव्हिएम मशीनमध्ये घोळ झाले. पुणे, ठाणे, नाशीकमध्ये मनसेच्या उमेदवारांना शुन्य मते कशीकाय पडू शकतात. असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टिका केली. 

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली मते मांडली. संघटना बांधणीसाठी या दौऱ्यावर आलो असून, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटनेत बदल करणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. 2019 मध्ये होणाऱ्या निवडूकांमध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता येणार नाही यासाठी हे संघटन बांधत असल्याचेही ठाकरे म्हणाले.

औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. हि सत्ता महापालिका काही खाऊन संपविण्यासाठी दिलेली नाही. औरंगाबाद मध्ये तेच-तेच लोक नवडून येत आहेत. इव्हीएम, आरक्षणाबाबत बोतलाना त्यांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टिका केली.
 
Web Title: BJP-Shiv Sena can not be formed in power - Raj Thackeray