पालकमंत्र्यांना सहपालकमंत्र्यांचा टेकू! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई - जिल्ह्याच्या राजकारणातले "वजनदार' नेतृत्व असलेल्या पालकमंत्र्यांच्या अधिकारात आता सहपालकमंत्र्यांची "मेख' मारत सरकारने श्रेयवादाची खेचाखेच सुरू केल्याचे संकेत आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी सात जिल्ह्यांच्या नवीन पालकमंत्र्यांची यादी आज जाहीर करताना राज्यात पहिल्यांदाच "सहपालकमंत्री' या पदाची स्थापना केली. सहयोगी पक्षाच्या मंत्र्यांना थेट पालकमंत्रिपद देण्याऐवजी सहपालकमंत्रिपद देत मुख्यमंत्र्यांनी सहयोगी पक्षाचाही अपेक्षा भंग केला आहे, तर शिवसेनेच्या पालकमंत्र्यांना सहपालकमंत्री सोबतीला देताना राजकीय डावपेचात भाजप मागे पडणार नाही, असेच दाखवून दिले आहे. 

उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना हटवत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची नेमणूक केली, तर त्यांच्या जोडीला सहपालकमंत्री म्हणून महादेव जानकर यांची नेमणूक केली आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांना यवतमाळच्या पालकमंत्रिपदावरून हटवण्यात आले असून, त्यांना वाशीमचे पालकमंत्री केले आहे. यवतमाळची जबाबदारी मदन येरावार यांच्याकडे दिली आहे. 

साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याही एकाधिकारशाहीला लगाम घालत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सहपालकमंत्रिपद देण्यात आले आहे. नांदेडच्या पालकमंत्रिपदी राज्यमंत्री अर्जून खोतकर, परभणीला गुलाबराव देवकर, सांगलीला सुभाष देशमुख, तर जळगावच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

Web Title: bjp-shiv sena politics