
चंद्रकांतदादा या कार्यक्रमाला उशीरा आले याबाबत माझ्या मनात कोणताही राग नाही. आता घरातच शिरायचे ठरवले आहे तर थोडे इकडे तिकडे होणार, सध्या आमची ताकद कमी आहे, हे आम्ही मान्य करतो.
- जयंत पाटील, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
कोल्हापूर : आपल्याकडे पाणी अडविण्याची क्षमता आहे. कोकणातले पाणी विदर्भाकडे नेता येईल का यासाठी अभ्यास झाला पाहिजे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची क्षमताच मोठी आहे, असेही ते म्हणाले.
मराठी पत्रकार संघाच्या येथील विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील, जयंत पाटील हे दोन नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
त्यानंतर जयंत पाटील यांनीही भाषण केले. जयंत पाटील म्हणाले, चंद्रकांतदादा या कार्यक्रमाला उशीरा आले याबाबत माझ्या मनात कोणताही राग नाही. आता घरातच शिरायचे ठरवले आहे तर थोडे इकडे तिकडे होणार, सध्या आमची ताकद कमी आहे, हे आम्ही मान्य करतो.
त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची क्षमताच मोठी आहे. तसेच मोजक्या घराण्याकडे असलेली सत्ता विकेंद्रीत होत चालली आहे. यामुळे लोकशाही अधिक प्रगल्भ होत चालली आहे. लोकांच्या किमान गरजा पूर्ण होत चालल्या आहेत, असेही ते म्हणाले.