Chandrakant Patil
Chandrakant Patil

...तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या 10 च्या आत येईल: पाटील

मुंबई : 288 जागांवर भाजपच्या जागा येतील अशी तयारी करा. आपल्या सहयोगी पक्षांना यामुळे मदतच होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळे लढले तर दोन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या 10 च्या आत येईल, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. 

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकरिणीची बैठक आज (रविवार) मुंबईत होत आहे. जागा वाटप, युती याबद्दल देवेंद्र फडणवीस योग्य ते निर्णय घेतील असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोंढा, एकनाथ खडसे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत 50 हजार कोटी पेक्षा जास्त पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन माझ्या हातून होणार नाही. बुथ रचनेच महत्वाचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले यामुळेच 2014 जिंकलो आता लोकसभा जिंकलो आणि विधानसभाही जिंकणार.  ईव्हीएममध्ये घोटाळा तर मग बारामती कशी जिंकली? हा प्रश्न आहे. वंचितमुळे काँग्रेसला फटका आणि भाजपाला फायदा झाला असे म्हणता येणार नाही. 

काँग्रेसचा बर्म्युडा झाला : रावसाहेब दानवे
काँग्रेसचा बरमोडा झाला आहे, अशी बोचरी टीका भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. चंद्रकांत दादा यांना भारतीय जनता पार्टीचा झेंडा मी हाती दिला आहे. या झेंडयाचा मजबूत दांडाही दिला आहे. चंद्रकांत दादांचा अनुभव दांडगा आहे ते पक्ष आणखी वाढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांना कामातून संधी देणारा पक्ष भाजप असून काँग्रेसचा बर्म्युडा झाला आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com