'वाघाच्या जबड्यात घालून हात, केला स्वत:चाच घात'; भाजप लक्ष्य!

टीम ई-सकाळ
Monday, 11 November 2019

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीला आणि बिहारमध्ये नितीशकुमारांना सोबत घेत भाजप सत्तेत जाऊन बसले. मात्र, भाजपला हा करिश्मा महाराष्ट्रात आपल्याच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेत दाखवता आला नाही.

सध्या राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा सरकार कुणाचं स्थापन होणार? कोण कुणाला पाठिंबा देणार? याचीच चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शविली. ही घोषणा करताना भाजपतर्फे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापना करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

Image may contain: text

- संजय राऊतच का बनलेत शिवसेनेच्या भात्यातील बाण?

त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीच्या पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी कंबर कसली आहे. आणि त्या दिशेने हालचालीही सुरू केल्या आहेत.

Image may contain: 1 person, text

दाक्षिणात्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही प्रादेशिक पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्यामुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडण्यास आता सुरवात झाली आहे. या मीम्सद्वारे भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे.

- लग्नाआधीच मराठमोळ्या सेलिब्रिटी कपलचं रोमॅंटिक फोटोशुट, पाहा फोटो

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीला आणि बिहारमध्ये नितीशकुमारांना सोबत घेत भाजप सत्तेत जाऊन बसले. मात्र, भाजपला हा करिश्मा महाराष्ट्रात आपल्याच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेत दाखवता आला नाही. तसेच भाजपने गोवा आणि मिझोराममध्येही बहुमत नसताना सरकार स्थापन केले होते.

Image may contain: 6 people, people smiling, meme and text

तसेच कर्नाटकातील विरोधी पक्षाचे आमदार फोडून सरकार बनविले होते. त्यामुळे शिवसेनेने भाजपसोबत दगाबाजी केल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. या गोष्टीची आठवण देत शिवसेनेच्या समर्थकांनी ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियावर भाजपवर चांगलाच सूड उगविला आहे. 

- 'रात्रीपर्यंत भाजपचाच मुख्यमंत्री होणार'

 Image may contain: 1 person


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP trolled on social media by netizens