रुपयाही न टाकता 20 कोटी काढणारे 'हे' एकमेव साहेब- भाजपचा टोला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. या व्यंगचित्रातून राज यांच्यावर टीका करताना कोहिनूर मिल प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. या व्यंगचित्रातून राज यांच्यावर टीका करताना कोहिनूर मिल प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे.  रम्याचे डोस नावाचे सदर सध्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून चालवले जात आहे. या अकाउंटवरुन अशा आशयाचे व्यंगचित्र प्रसिद्ध करत ही टीका करण्यात आली आहे.

कोट्यधीश जादूगार असे  शीर्षक देऊन हे व्यंगचित्र प्रदर्शित करण्यात आले आहे. या व्यंगचित्रात एक माणूस दाखवण्यात आला आहे. तो माणूस व्यंगचित्रातील रम्याकडे येऊन म्हणतो की, अरे काल मी जादूचे प्रयोग बघितले, त्या जादुगाराने 2 रुपयांचं नाणं एका रिकाम्या डब्यात ठेवलं आणि दोन सेकंदात त्या नाण्याची 2000 रुपयाची नोट करुन दाखवली. आम्ही बघतच राहिलो रे, त्यावर रम्या म्हणतो,  छ्या… त्यात काय मोठं? ह्याला काय जादू म्हनतात होय.. आपल्या कृष्णकुंजवरच्या सायबांनी एकही रुपया टाकला न टाकता 20 कोटी काढून दाखवले… असं म्हणत भाजपने राज ठाकरेंवर टीका केली आहे.
 

दरम्यान, विरोधकांवर टीका करण्यासाठी भाजपने रम्याचे डोस नावाने एक सदर सुरु केले आहे. याआधीच्या व्यंगचित्रांमधूनही विरोधकांवर टीका करण्यात आली आहे. आता राज ठाकरेंवर कोहिनूर प्रकरणावरुन भाजपने निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणातील कोट्यधीश असे रम्याच्या माध्यमातून संबोधले आहे. आता भाजपला मनसे काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp Tweets Cartoon Against Raj Thackeray