भाजप #WhereIstheHosh?, भाजपमध्ये निवडणुकीचे वारे संचारले: मुंडे

भाजप #WhereIstheHosh?, भाजपमध्ये निवडणुकीचे वारे संचारले: मुंडे

मुंबई- एकीकडे देश चिंताग्रस्त, भयग्रस्त वातावरणात आहे. आपल्या जवानाची पाकिस्तानातून सुटका व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे, पाकला चोख उत्तर देण्यासाठी सैन्य रणनिती आखत आहे आणि दुसरीकडे भाजप मेरा बुथ सबसे मजबूतची भाषणे ठोकतंय. भाजप नेतृत्वात निवडणुकांचं वारे संचारले असल्याटी टीका राष्ट्रवादीचे नेते विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान, मेरा बूथ सबसे मजबूत कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ता.28) भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉर्न्फन्स् द्वारे मोदींनी 1 करोड कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बुथ कार्यकर्त्यांनी येत्या निवडणूकीच्या अनुषंगाने काय खबरदारी घ्यायला पाहिजे याविषयी मोदींनी बूथ कार्यकर्त्यांना काही पर्याय सूचविले. यावरून धनंजय मुंडे यांनी ट्विट करत भाजप नेतृत्वावर टीकेची झोड उठवली आहे. सोबतच त्यांनी #WhereIstheHosh? हा हॅशटॅग वापरत भाजप नेतृत्वाचे डोके ठिकाणावर आहे काय असा प्रश्न केला आहे.
 


त्याचबरोबर, त्यांनी सोबत दोन फोटो ट्वीट करत भाजप सैन्याचा पुरेपुर वापर प्रचारासाठी करत असल्याचे दाखवले आहे. भारताने केलेल्या हवाई हल्यामुळे कर्नाटकात भाजपच्या लोकसभेला 22 जागा येतील, या भाजपनेते येडीयुरप्पा यांच्या वक्तव्याची एका इंग्रजी वृत्तपत्राची बातमी शेअर करतही त्यांनी हे काय चालले आहे? असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com