राज्यात 40 आमदारांना डच्चू देण्याची भाजपची तयारी?

टीम ईसकाळ
बुधवार, 5 जून 2019

लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप शिवसेनेनं काही ठिकाणी लोक नाराज असललेले उमेदवार बदलले होते. त्यामुळे मतदार नाराज असलेल्या जागांवर युतीला विजय मिळवता आला. हेच समिकरण पुढे चालू ठेवत यावेळी भाजप राज्यातील 40च्या वर विद्यमान आमदारांना नारळ देत नवे उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे.

पुणे : लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप शिवसेनेनं काही ठिकाणी लोक नाराज असललेले उमेदवार बदलले होते. त्यामुळे मतदार नाराज असलेल्या जागांवर युतीला विजय मिळवता आला. हेच समिकरण पुढे चालू ठेवत यावेळी भाजप राज्यातील 40च्या वर विद्यमान आमदारांना नारळ देत नवे उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे.

यामध्ये खासकरून मराठवाड्यात 8 पैकी 7 जागा जिंकत भाजप-शिवसेनेनं चांगल यश मिळवलं आहे. लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप युतीला मोठा फायदा झाला. या धर्तीवर भाजप राज्यासह मराठवाड्यातही काही विद्यमान आमदारांना डच्चू देणार आहे आणि नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. उमेदवार बदलण्याची निकष, आमदारांबदृल असणारी मतदारांची मत, त्यांची निवडून येण्याची क्षमता, त्यांनी केलेली काम, सरकारच्या योजनांचा त्यांनी केलेला प्रचार आणि राबवलेली यंत्रणा या सगळ्यांबाबतचा भाजपने सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, मराठवाड्यातील काही आमदारांना डच्चू देणार आहे, गेल्या वेळी जिथं पराभव झाला तिथंही नवे चेहरे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत भाजपमध्ये खलबंतही सुरु झाली आहे, भाजपने सर्वेक्षण करून 40 लोकांची जरी यादी काढली असली तरी किमान 25 जागांवर भाजप ठाम असल्याचं कळतं, याबाबत भाजपकडून कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. येणारी विधानसभा भाजपसाठी महत्वाची आहे, युतीच्या समिकरणानुसार ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असंही होवू शकतं त्यामुळं जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजप शक्ती लावणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp will drop 40 existing mlas in Vidhansaha Election