भाजप छोट्या पक्षांची 18 जागांवर करणार बोळवण?

भाजप छोट्या पक्षांची 18 जागांवर करणार बोळवण?

मुंबई : विधानसभा निवडणुकीत लहान पक्षांची भाजप 18 जागांवर बोळवण करणार असल्याने छोटे पक्ष नाराज असल्याचे समजत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आरपीआयसोबत बैठक झाली आहे. आरपीआयने 22 जागांची मागणी केली असली तरी निदान 8 ते 10 जागा तरी मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. यामध्ये दलित बहुसंख्यांक असलेल्या मुंबईतील 4 जागांची मागणी करण्यात आली आहे.

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने 52 जागांची मागणी केली असली तरी 12 जागा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारामध्ये आलेल्या महापुरात दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात गमावल्याने शेतकर्‍यांना दुभती जनावरे देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे. एक दुभती गाय आणि म्हैस देऊन शेतकर्‍यांना रोजगार देण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचीही यावेळी जानकरांनी माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com