अमित शहांनी घेतला भाजपच्या कामगिरीचा आढावा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 मार्च 2017

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेऊन नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचा आढावा घेतला. शेलार यांनी विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत केले. यानंतर शहा यांनी परळ येथील "यशवंत भवन' येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील राजकीय घडामोडी त्यांनी जाणून घेतल्या; तसेच उत्तर प्रदेशमधील निवडणुकीतील भाजपची कामगिरी कथन केली.
Web Title: bjp work review by amit shaha