भाजपाचा 'तो' रथ महाराष्ट्रात; मुख्यमंत्र्यांसाठी लाभदायक?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा 01 ते 09 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात होईल.

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा 01 ते 09 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात होईल. या यात्रेसाठी वापरण्यात येणारा रथ सज्ज झाला आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान फडणवीस 25 दिवस रथातच घालवतील. भाजप अध्यक्ष अमित शहांनी पश्चिम बंगालमधील यात्रेदरम्यान याच रथाचा वापर केला होता. 

अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून यात्रेला सुरुवात होईल. या यात्रेसाठी वापरला जाणारा लवकरच मोझरीत दाखल होईल. या रथाला मुंबईत अंतिम स्वरुप देण्यात आलं असून असा आणखी एक रथदेखील तयार ठेवण्यात आला आहे. पर्याय म्हणून हा रथ वापरला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान पार पडेल. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेदरम्यान 25 दिवस रथातच असतील. 

गेल्या 06 वर्षांमध्ये भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी वापरलेल्या रथाचाच वापर मुख्यमंत्री करतील. अमित शहा यांच्याशिवाय मध्यप्रदेश, दिल्ली, ओडिशातही भाजपने प्रचारासाठी हाच रथ वापरला होता. भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी याच रथातून प्रचार केलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs chariot ready for cm devendra fadnavis maha janadesh yatra