भाजपच्या ‘कुंभकर्णा’ला जागे करणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई - ‘देशातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदू राममंदिर बांधण्यासाठी आतुर असताना न्यायालयाकडे बोट दाखवू नका. त्याऐवजी थेट संसदेत राममंदिर उभारणीचा कायदा करा,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा भाजपला आव्हान दिले. पूर्ण बहुमतातील सत्तेत असताना राममंदिर बांधता येत नसेल, तर राममंदिराच्या नावाने निवडणुकीत प्रचार करण्याचा सरकारला अधिकार काय, असा सवाल करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर नाव न घेता प्रहार केला. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मंदिरासाठी झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्याचे काम शिवसेना करत आहे. हा कुंभकर्ण जागा होणार नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही. येत्या २४ डिसेंबरला पंढरपूर येथे या झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाही ठाकरे यांनी या वेळी केली. शिवसेना भवनात आज राज्यभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

अयोध्या दौऱ्यानंतर आज पुन्हा उद्धव यांनी राममंदिर उभारणीवरून आक्रमक पवित्रा घेतला. राममंदिराचा विषय संसदेत कायदा करूनच सुटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातल्या हिंदूंच्या भावना तीव्र असल्याने सरकारने याची दखल घ्यावी व कायदा करावा. केवळ न्यायालयाचे कारण देऊन वेळकाढूपणा करू नये, अशी टीकाही त्यानी केंद्र सरकारवर केली. 

आक्रमक होण्याचा आदेश
राज्यात दुष्काळाची झळ सुरू झालेली असताना शिवसेनेने दुष्काळी उपाययोजनांसाठी आक्रमक होण्याचे आदेश ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. आज प्रत्येक जिल्हाप्रमुख,
तालुकाप्रमुख, संपर्कनेते, नेते व उपनेते यांच्याशी झालेल्या बैठकीत दुष्काळी उपाययोजनांसाठी शिवसेनेने जनतेसोबत सज्ज राहावे, असे आदेश त्यांनी दिले. सत्तेत असलो तरी दुष्काळी जनतेची प्रशासनाकडून अडवणूक होत असेल, तर त्या ठिकाणी तत्काळ दखल घ्या. जनतेसोबत थेट संवाद घडवून त्यांच्या अडचणीवर तत्काळ मात करून दिलासा देण्यासाठी कार्यरत राहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Web Title: BJP's Kumbhakarna will wake up says uddhav thackeray