मित्र पक्षांमुळे भाजपचे नुकसान

- तुषार खरात
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबईत आणखी जागा वाढल्या असत्या 
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मित्रधर्म पाळण्यासाठी रिपब्लकीन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम या पक्षांना सुमारे 35 जागा दिल्या होत्या. पण या जागांवर एकही उमेदवार निवडून आला नाही. भारतीय जनता पक्षाने या जागेवर स्वतःचे उमेदवार लढविले असते तर आमच्या आणखी कमीत कमी 10 ते 15 जागा वाढल्या असत्या, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी "सकाळ"शी बोलताना केला. 

मित्र पक्षांना या जागा देताना कमळ चिन्ह घेऊन लढण्याचाही आम्ही सल्ला दिला होता. पण मित्र पक्षांनी आमचा सल्ला ऐकला नाही. कमळ चिन्ह घेतले असते तर मित्र पक्षांचे उमेदवारही मोठ्या संख्येने निवडून आले असते.

भाजपने या निवडणुकीत 195 जागा लढून त्यातील 82 जागांवर विजय मिळविला आहे. हे प्रमाण लक्षात घेता मित्र पक्षांनी 35 जागांपैकी किमान 10 ते 15 जागांवर विजय संपादन करणे अपेक्षित होते. या 10 ते 15 जागांवर आम्ही यशस्वी झालो असतो, तर मुंबई महापालिकेत पहिल्या क्रमांकाचे नगरसेवक आमच्याकडे असते. शिवाय आता जे त्रांगडे निर्माण झाले आहे, ते त्रांगडे कदाचित निर्माणही झाले नसते, असाही दावा या पदाधिका-यांनी केला आहे. 

मिक्ष पक्षांमुळे नुकसान - गणेश हाके 
निवडणुकीपूर्वी केलेल्या पाहणीमध्ये मुंबईमध्ये आम्ही पहिल्या क्रमांकावर राहू, असा अंदाज पुढे आला होता. पण मित्र पक्षांच्या सगळ्याच उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे आम्ही शिवसेनेपेक्षा किंचित मागच्या स्थानावर राहिलो. मित्र पक्षांमुळे आमचे नुकसान झाले हे खरेच आहे. - गणेश हाके, प्रवक्ते, भाजपा 

भाजपाने असहकार्य केले 
भाजपाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात आम्ही हिरिरीने मदत केली. पण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला तशी मदत केलीच नाही. आमच्या मदतीमुळेच भाजपचे अनेक उमेदवार निवडून आले आहेत. पण त्यांनी सहकार्य केले नसल्यामुळे आमचे उमेदवार निवडून आले नाहीत.

- गौतम सोनावणे, मुंबई अध्यक्ष, रिपाइं

Web Title: BJP's loss of friends party