सोलापूरमध्ये भाजपची स्वबळाची तयारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

सोलापूर - भाजप-शिवसेनेमध्ये सध्या मोठा भाऊ भाजप आहे. भाजप मोठा भाऊ आहे, म्हटल्यावर मोठ्या भावाचा वाटाही मोठाच असणार. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्याची आमची मानसिकता होती; परंतु शिवसेनेकडून युतीबाबत प्रतिसाद येत नसल्याने आम्ही स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

देशमुख म्हणाले, की शिवसेनेसोबत युती करण्यासाठी त्यांचे संपर्कप्रमुख खासदार राहुल शेवाळे, खासदार गजानन कीर्तिकर यांच्याशी मी चर्चा केली; परंतु शिवसेनेकडून युतीबाबत कसलाही प्रतिसाद येत नसल्याने आम्ही स्वबळाची तयारी केली आहे. महापालिकेच्या सर्व प्रभागांसाठी आजपासून भाजपच्या इच्छुकांचे उमेदवारी अर्ज घेण्यास सुरवात केली आहे. 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत सध्या सोलापूर शहरात भाजपची चांगली स्थिती आहे. दोन आमदार येथून विजयी झाले आहेत. त्यामुळे जरी आमची युती झाली तरीही जागावाटपाची नवी पद्धत असणार आहे. नवीन निकषांनुसार जागावाटप होईल, असेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. 

"त्यांना' भाजपचे दरवाजे बंद 
कॉंग्रेसमधून भाजपमध्ये येण्यास 12 नगरसेवक इच्छुक असल्याचा दावा पालकमंत्री देशमुख यांनी मध्यंतरी केला होता. याबाबत विचारले असता पालकमंत्री देशमुख म्हणाले, की आमच्याच कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसाठी मारामारी होऊ लागली आहे. त्यांना घेऊन काय करता? आता त्यांना भाजपचे दरवाजे बंद झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: BJP's strength in preparation for self Solapur