शवविच्छेदनासाठी मृतदेह पुन्हा काढला 

शवविच्छेदनासाठी मृतदेह पुन्हा काढला 

गंगाखेड : रोकडेवाडी (ता. पालम) लसीकरणानंतर दगावलेल्या दोन बालकांपैकी एका बालकावर शवविच्छेदन करण्यासाठी पुरलेला मृतदेह शुक्रवारी (ता. 9) उकरून काढून रात्री 11 वाजता अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, दुसरे मृत बालक राम निळे याच्यावर काल रोकडेवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

रावराजूर (ता. पालम) आरोग्य केंद्रांतर्गत रोकडेवाडी येथील चार बालके व एका गर्भवती महिलेला सहा नोव्हेंबरला राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमातून लसीकरण करण्यात आले. त्यात राम व्यंकटेश निळे या एक महिन्याच्या बालकाला बीसीजी व पोलिओ लस दिली होती. उपचार सुरू असताना त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. या बालकाचे शवविच्छेदन अंबाजोगाई येथे झाले. दुसरे बालक राधाकृष्ण गोपाळ सकनूर याचे सात नोव्हेंबर रोजी परळीच्या खासगी रुग्णालयात निधन झाले.

निधनानंतरशवविच्छेदन न करताच दफन करून अंत्यसंस्कार केले. त्याच्या पालकांनी मुलाचा मृतदेह पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदन करावे, अशा मागणीचा अर्ज गंगाखेड पोलिस ठाण्यात दिला. या अर्जावरून काल सायंकाळी राधाकृष्ण सकनूरचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com