गणपती विसर्जनात डीजेचा 'आव्वाज' नाहीच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

डीजेसारख्या कमालीचे ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाद्यांना गणपती विसर्जनाच्या मिरवणुका व अन्य उत्सवांत परवागी दिली जाऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात मांडण्यात आली. या भूमिकनेनंतर न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली आहे. 

मुंबई : गणेशोत्सवात डीजे आणि ध्वनीयंत्रणा लावण्याबाबत मुंबई न्यायालयाने बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे या गणपती विसर्जनात डीजे आणि ध्वनीयंत्रणा नसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ध्वनीप्रदुषणाच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयाने ही बंदी घातली आहे. 

गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या कर्कश आवाजाला आळा बसावा, यासाठी पोलिसांनी ध्वनीयंत्रणा आणि डीजे वाजवण्यास परवानगी नाकारली होती. पोलिसांच्या या निर्णयाविरोधात 'प्रोफेशनल ऑडिओ अँड लाइटनिंग असोसिएशन'ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल (शुक्रवार) सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने डीजे आणि ध्वनीयंत्रणा लावण्याबाबत परवानगी दिली नाही. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

डीजेसारख्या कमालीचे ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाद्यांना गणपती विसर्जनाच्या मिरवणुका व अन्य उत्सवांत परवागी दिली जाऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात मांडण्यात आली. या भूमिकनेनंतर न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली आहे. 

Web Title: Bombay High Court Dj Ban Maharashtra Ganesh Visarjan 2018 Noise Pollution