esakal | पेटीएमवरूनही बुक करा एसटी तिकीट 
sakal

बोलून बातमी शोधा

पेटीएमवरूनही बुक करा एसटी तिकीट 

एसटी प्रवाशांना ऑनलाइन स्वरूपात तिकिटे मिळविण्यासाठी आता पेटीएमची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी रेडबस, इंद्रधनू, एमएसआरटीसी ऍपने ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येत होते.

पेटीएमवरूनही बुक करा एसटी तिकीट 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एसटी प्रवाशांना ऑनलाइन स्वरूपात तिकिटे मिळविण्यासाठी आता पेटीएमची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी रेडबस, इंद्रधनू, एमएसआरटीसी ऍपने ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येत होते. त्यानंतर एमएसआरटीसीने आता पेटीएमसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना पेटीएमचा वापर करूनही खासगी बसच्या तुलनेत एसटीची किफायतशीर सेवा मिळवता येणार आहे. 

विशेष म्हणजे, इतर ऍपप्रमाणेच पेटीएमवरही खासगी प्रवासी वाहतुकीपेक्षा एसटीची सेवा किती फायद्याची आहे, हे तपासता येणार आहे. यामुळे रेल्वे वेळापत्रकासारखेच सोईची गाडी तपासून तिकीट मिळवता येईल. त्यामुळे आता एसी-शिवनेरी, शिवशाही, शिवशाही स्लिपर, सेमी लक्‍झरी, डे ऑर्डिनरी, नाइट एक्‍स्प्रेस, ऑर्डिनरी एक्‍स्प्रेस या बससाठी सुलभतेने तिकीट आरक्षित करता येईल. सध्या पेटीएम पाच राज्यांमध्ये तेथील परिवहन महामंडळासाठी तिकीट बुकिंग सेवा देत आहे. त्यात आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा, तमिळनाडू यांचा समावेश आहे. 

एसटीच्या प्रवाशांना सुलभ पद्धतीने तिकीट आरक्षित करण्याचा अनुभव देण्यासाठी आम्ही एमएसआरटीसीशी करार केला आहे. प्रवाशांना राज्यात तिकीट बुकिंगसाठी पेटीएम ऍप आणि वेबसाइटवरून सहजपणे तिकिटे आरक्षित करता येतील. 
- अभिषेक राजन, उपाध्यक्ष, पेटीएम 

एसटीच्या तिकीट खिडकीशिवाय एसटीच्या अधिकृत एजंटमार्फतही तिकिटे मिळवता येतात. आता ऑनलाइन सेवेत पेटीएमची सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना स्पर्धा निर्माण होऊन प्रवाशांना फायदा होईल. 
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, वाहतूक विभाग 

loading image
go to top