माझ्यामुळे ब्राह्मण, मराठे जयभीम म्हणाले - रामदास आठवले

बालगंधर्व रंगमंदिर - लक्ष्मीबाई वाडेकर यांची पुस्तकतुला रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आली.  या वेळी रावसाहेब कसबे, परशुराम वाडेकर.
बालगंधर्व रंगमंदिर - लक्ष्मीबाई वाडेकर यांची पुस्तकतुला रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी रावसाहेब कसबे, परशुराम वाडेकर.

पुणे - ‘‘माझ्यावर अनेक आरोप झाले तरी मला काही फरक पडणार नाही. मी जयभीमचा नारा कायमच बुलंद करत राहणार. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग करून मी ब्राह्मण आणि मराठ्यांना जयभीम म्हणायला लावले,’’ असे प्रतिपादन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

सांस्कृतिक महोत्सव समिती, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग (बार्टी), डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज्‌, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने सम्यक साहित्य संमेलन सुरू आहे. व्यासपीठावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र गवई उपस्थित होते. या वेळी परशुराम वाडेकर यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई वाडेकर यांच्या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम झाला. त्यानिमित्ताने त्यांची पुस्तकतुला करण्यात आली. चळवळीतील कार्यकर्त्यांच्या आईचाही सन्मान करण्यात आला.  

आठवले म्हणाले, ‘‘लक्ष्मीबाई वाडेकर यांनी रोजंदारीचे काम करून कष्टातून मुलांना घडवले. प्रत्येक कार्यकर्त्याच्या त्या आई आहेत.’’ या वेळी आठवले यांनी त्यांच्या शैलीत कविताही सादर केली. 

आईविषयी बोलताना परशुराम वाडेकर यांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, ‘‘पुण्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांचा आणि आईचा दांडगा परिचय आहे. आईने वेळप्रसंगी भीक मागितली. कामावर जाताना लहान भाऊ झोपेतून उठू नये म्हणून त्याच्या टाळूला अफू लावायची. चळवळीतील प्रत्येक आई असामान्य आहे.’’ मुलाच्या तोंडातून आपले कौतुक ऐकताना लक्ष्मीबाईंनाही गहिवरून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com