चंद्रकांत पाटलांना विठ्ठलाची महापूजा करण्यास ब्रिगेडचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यास आता संभाजी ब्रिगेडनेही विरोध दर्शवला आहे. संभाजी ब्रिगेड पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण घाडगे यांनी विरोध केला. 

पंढरपूर : कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यास आता संभाजी ब्रिगेडनेही विरोध दर्शवला आहे. संभाजी ब्रिगेड पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण घाडगे यांनी विरोध केला. 

शुक्रवारी (ता.8) कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या होणार आहे. महसूल मंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापुजेस मंगळवारी येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्याने विरोध केला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. 

त्यानंतर तातडीने मंदिर समितीचे सदस्य व जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजी शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना महापूजा करण्यात विरोध नसल्याचे स्पष्ट करत श्री. पाटील यांचे स्वागत करु असे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेने आपले आंदोलन म्यान केले असले तरी संभाजी ब्रिगेडने मात्र चंद्रकांत पाटलांना विरोध केला आहे. संभाजी ब्रिगडेच्या विरोधामुळे पुन्हा चंद्रकांत पाटलांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेवरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brigade opposes Chandrakant Patil to perform Vittha Puja