Budget 2019 : अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांच्या हिताचा विचार : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

अर्थसंकल्प 2019 : मुंबई : ''केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करुन अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याबद्दल सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हार्दिक अभिनंदन करतो,'' अशा शब्दांत महसूल तथा सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महसूल मंत्री पाटील म्हणाले की, “भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी या अर्थसंकल्पाद्वारे देशाची अर्थव्यवस्था पुढील काही वर्षांसाठी पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वामध्ये केंद्र सरकार निश्चितच पूर्ण करेल. या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्राला ऊर्जा देण्यासोबतच महिलांचे आरोग्य, मुलांची सुरक्षा या सारख्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न धावता, उद्योगाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. यामुळे तरुणांमध्ये उद्योजकता वाढीस लागून, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.” असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

जल व्यवस्थापनासाठी घेतलेल्या निर्णयाचेही महसूल मंत्री पाटील यांनी स्वागत केले आहे. “या अर्थसंकल्पामध्ये जल व्यवस्थापनाला देखील महत्त्व देण्यात आले आहे. यासाठी 'हर घर जल' योजनेअंतर्गत 2024 पर्यंत सगळ्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी, घरापर्यंत पाण्याचं कनेक्शन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे दुष्काळी भागातील जनतेचं जीवन सुसह्य होईल,” अशी सविस्तर प्रतिक्रिया मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget 2019 The idea of ​​general interest of common people in the budget says Chandrakant Patil