Budget Session : "अधिकारी मंत्र्यांना मॅनेज करून..."; प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप, सरकारला घरचा आहेर | Budget Session Maharashtra 2023 Pravin darekar Allegation on Government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin Darekar
Budget Session : "अधिकारी मंत्र्यांना मॅनेज करून..."; प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप, सरकारला घरचा आहेर

Budget Session : "अधिकारी मंत्र्यांना मॅनेज करून..."; प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप, सरकारला घरचा आहेर

Pravin Darekar Latest News : सोसायट्यांना एनओसी देताना सरकारी अधिकारी मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी आज केला आहे. मंत्र्यांच्या सहकार्याने हे अधिकारी काम करत असल्याचं सांगत दरेकरांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मंत्र्यांना मॅनेज करुन अधिकारी त्यांच्या पदावर कायम राहत असल्याचा गंभीर आरोप दरेकरांनी (Pravin Darekar) आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केला आहे. एसआरएचे निवासी अभियंता सानप एनओसी देण्यासाठी प्रत्येक सोसायटीला दीड कोटी रुपये मागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही केली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांवर आरोप होऊन देखील अधिकारी पदावर कायम राहतोच कसा? गृहनिर्माण मंत्र्यांनी या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसंच राज्य सरकारला सुनावलंही आहे.