अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीपासून नागपुरात

महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने ही माहिती दिली आहे.
Budget Session
Budget SessionTeam eSakal

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरमध्ये होणार आहे. याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता हा निर्यण झाला असून, 28 फेब्रुवारीपासून कामकाजाला नागपुरमधून सुरुवात होणार आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार असून मार्च महिन्यात अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्याआधी येत्या 31 जानेवारीपासून दिल्लीत संसदीय अधिवेशन पार पडणार आहे. देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर राज्याची काही प्रमाणात आर्थिक रणनीती ठरणार असल्याचे सूतोवाच अजित पवारांनी प्रजासत्ताकदिनी पुण्यात केले होते.

Budget Session
निलंबनाचा वाद चिघळणार? SC च्या निर्णयावर जाधवांचं मोठं विधान

महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय (budget)अधिवेशन नागपुरात घेण्याची (Nagpur) घोषणा करून विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अधिवेशनासाठी काही कालावधी शिल्लक असताना प्रशासनाला कोणत्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नव्हत्या. वरिष्ठ पातळीवरही बांधकाम विभागाची एकही बैठक झालेली नव्हती नाही. त्यामुळे अधिवेशनाची घोषणा फक्त राजकीय ठरणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र 28 तारखेपासून विधिमंडळाच्या कामकाजाला नागपूरमधून सुरूवात होणार असल्याने, अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com