मानखुर्दमध्ये इमारत कोसळून तीन ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

मुंबई : मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमधील साई बाबा रहिवाशी संघामत इमारत कोसळून झालेल्या अपघातात तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. तर तीन अल्पवयीन बालकांसह 12 जण जखमी झाले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 7 वाजून आठ मिनिटांनी ही इमारत कोसळली. आज (गुरुवार) पहाटे एक इमारत जवळच्या दोन इमारतींवर कोसळली. त्यामध्ये तीन जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये रेखा वानखेडे (वय 30), शंकर वानखेडे (वय 38) आणि कस्तुरबा वानखेडे (वय 60) यांचा समावेश आहे. इमारत कोसळल्याने पवार, गावडे, वानखेडे कुटुंबिय बाधित झाले आहेत.

जखमींना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन पथक दाखल झाले असून मदतकार्य अद्यापही सुरू आहे. स्थानिक नागरिक ढिगारा उचलण्यासाठी आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करत आहेत.

Web Title: Building collapses in Mumbai's Mankhurd area