बोंड अळीची धास्ती कायम 

वीरेंद्रसिंह राजपूत
सोमवार, 25 जून 2018

नांदुरा (जि. बुलडाणा) - यंदा नांदुरा तालुक्‍यात मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवड कमी झाली असून, कमी पाण्यातील ही कपाशी जगविताना शेतकऱ्यांना नाकीनाऊ आले आहे. या कपाशीला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कपाशीची वाढ जोमदार असली तरी त्यावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मागील वर्षीच्या बोंड अळीच्या धास्तीने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा व मलकापूर तालुक्‍यात सर्वाधिक कपाशीचा पेरा हा मॉन्सूनपूर्व लागवडीतून होतो. नांदुरात सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा असतानाही येथील शेतकऱ्यांनी टॅंकरचे विकतचे पाणी घेऊन अतिशय कमी पाण्यात मोठ्या प्रमाणावर मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. मात्र, या पिकावर बारीक अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे. मागील वर्षी नव्याने आलेल्या शेंदऱ्या बोंड अळीचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे या वर्षीही पुन्हा बोंड अळीची पुनरावृत्ती होणार नाही ना, अशी शेतकऱ्यांना शंका आहे. 

बोंड अळीचा प्रादुर्भाव हा शक्‍यतो पिकाच्या फुलपाती व बोंड येण्याच्या अवस्थेत होतो. आता आलेली अळी ही नेमकी कोणती, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कळेल. शेतकऱ्यांनी वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना करावी. कृषी विभागाकडून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल. 
- पी. ई. अंगाइत, तालुका कृषी अधिकारी, नांदुरा 

Web Title: buldhana news cotton bollworm