कर्जमाफीचे निकष किचकटच - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

बुलडाणा - फडणवीस सरकारने केलेल्या कर्जमाफीचे निकष किचकट आणि अस्पष्ट आहेत. त्याचबरोबर हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोमवारी येथे केले. 

बुलडाणा - फडणवीस सरकारने केलेल्या कर्जमाफीचे निकष किचकट आणि अस्पष्ट आहेत. त्याचबरोबर हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोमवारी येथे केले. 

बुलडाणा येथे पक्षसंघटनेच्या संदर्भात आयोजित या पत्रकार परिषदेला महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष नाझेर काझी आदी उपस्थित होते. ""या सरकारच्या काळात असहिष्णुतेचे वातावरण वाढले आहे. शेतकरी, शेतीमालाला भाव, कुपोषण, डॉक्‍टर, शिक्षकांचे प्रश्‍न, सर्वसामान्य कामगार, नोटाबंदीचे फटके अशा सर्वच पातळ्यांवर सरकार अपयशी ठरले आहे, असे सांगून सधन शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतात, असे भाजपचे म्हणणे आहे; परंतु त्यांनी उदाहरणासह हे दाखवून द्यावे,'' असे आव्हान सुळे यांनी दिले. 

राष्ट्रपती पदासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या,""या विषयावर बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. आज त्या संदर्भात काही सांगता येणार नाही.'' मुदतपूर्व निवडणुकीसंदर्भात त्या म्हणाल्या की, राजकीय पक्ष म्हटल्यावर निवडणुकीसाठी केव्हाही तयार राहावेच लागते. जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा त्यांनी निषेध करीत अशा घटनांमध्ये महिलेची जात किंवा धर्म कोणता हे महत्त्वाचे नसून ती एक महिला आहे. याबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

Web Title: buldhana news farmer loan supriya sule