HSC Exam 2023 : बारावी गणित पेपरफूटी प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे

गणित पेपरफूट प्रकरणातील आरोपींची संख्या सातवर
HSC Exam 2023
HSC Exam 2023 Esakal

HSC Exam 2023: बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्यामुळे शिक्षण यंत्रणेवर आक्षेप घेण्यात येत होते. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

बारावी गणितच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये आता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आलं आहे. रविवारी पोलिसांनी पकडलेल्या पकडलेल्या दोन्ही आरोपी शिक्षकांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या आरोपींना देऊळगावराजा येथील न्यायालयात हजर करण्यात आलं होते. आतापर्यंत या प्रकरणात आरोपींची संख्या सातवर गेली आहे. एसआयटीचे हे पथक मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण तपास करणार आहे.

राज्यभर चर्चेचा विषय ठरलेला इयत्ता बारावीचा गणित पेपर सोशल मीडियावर फुटल्याची घटना तीन मार्च रोजी सिंदखेड राजा तालुक्यात घडली आहे. तो पेपर ही सोशल मीडियावर व्हायरल झाला. पेपर फुटल्याचे प्रकरणं विधिमंडळांतही चर्चेला आलं होतं. यातून हा प्रकार संपूर्ण राज्यभरात चर्चेत आला होता.

HSC Exam 2023
Rahul Gandhi : राहुल गांधींनी केली RSS ची मुस्लिम ब्रदरहुड बरोबर तुलना, ब्रिटिश संसदेतील वक्तव्य वादात

शिक्षण विभागाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर चौकशी करण्यात आली आहे. गणिताचा पेपर व्हायरल करणाऱ्यांपैकी एकूण 7 जणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. आता या प्रकरणात एसआयटी तपास करणार असल्यानं दोषींवर कारवाई निश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गणित पेपर फूटीप्रकरणी खाजगी संस्थाचालक असलेले शिक्षक गजानन आडे, गोपाल शिंगणे यांच्यासह गणेश पालवे, पवन नागरे आणि गणेश नागरे या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या पाचही आरोपींना देऊळगावराजा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आहे.

HSC Exam 2023
Uddhav Thackrey : नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; कशी असणार नवी घटना?

न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व होत असतानाच उशिरा लोणार येथील शाळेवर कार्यरत असलेल्या शेख अकील शेख मुनाफ आणि अंकुश पवार या दोघांना रात्री अटक करण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपींची संख्या सात झाली आहे. त्यानंतर आता तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com