बुलेट ट्रेन उभारणीसाठी कालबद्ध कार्यवाही करावी - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई - मुंबई-अहमदाबाद जलद गती रेल्वे (बुलेट ट्रेन) मार्ग उभारणीसाठी आवश्‍यक विविध बाबींवर कालबद्ध कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीवकुमार यांच्या उपस्थितीत व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाबाबत आढावा बैठक झाली.

बैठकीत या प्रकल्पाशी निगडित विविध बाबींवर जिल्ह्यनिहाय आढावा सादर करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस व डॉ. राजीवकुमार यांनी चर्चा केली. प्रकल्पासाठी आवश्‍यक अशा विविध बाबींवर कार्यवाही वेळेत व्हावी यासाठी कालबद्ध नियोजन करावे. संपादित जमिनींचा मोबदला तातडीने देण्यात यावा. अन्य प्रशासकीय बाबी, मान्यता बाबतीतही वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.

बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, नॅशनल हायस्पिड रेल कार्पोरेशनचे अधिकारी यू. पी. सिंह आदी उपस्थित होते.

Web Title: bullet train chief minister