बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई - प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचे सुधारणा विधेयक आज विधनसभेत चर्चेअंती मंजूर करण्यात आले. त्यानंतर हे विधेयक विधान परिषदेत चर्चेविना मंजूर करण्यात आले. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. 

काही प्राणीप्रेमी संघटना 2014 मध्ये बैलगाडा शर्यतींच्या विरोधात न्यायालयात गेल्या होत्या. त्या वेळी न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. परिणामी शर्यतप्रेमी शेतकरी, कार्यकर्ते यांचा हिरमोड झाला होता. ही बंदी उठवण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रयत्नांची शिकस्त केली होती. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे. 

विधनसभेत आज पशू व दुग्धसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी विधेयक मांडले. या विधेयकावर महेश लांडगे, बाबूराव पाचर्णे, प्रकाश आबीटकर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा आदींनी सूचना केल्या. बैलगाडा शर्यत घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. यापूर्वी अशी परवानगी स्थानिक पोलिस ठाण्यातून घेतली जात होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही, अशी सूचना बहुसंख्य सदस्यांनी केली. "बैलगाडा शर्यत'मध्ये शंकरपट, छकडी असे पर्यायी शब्द वापरले आहेत. तरीही टांगा शर्यत, एक बैल, एक घोडा शर्यत, चिखलगुट्टा शर्यत आदींचाही यात समावेश करण्याची मागणी सदस्यांनी केली. अशा शर्यतीत प्राण्यांना वेदना झाली, तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास पाच लाख रुपयांपर्यंत दंड केला जाण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

तमिळनाडूतील "जलिकट्टू'ला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर राज्यातील बैलगाडा शर्यतप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. 

प्राण्यांसाठी रुग्णवाहिका - जानकर 
प्राण्यांसाठी दवाखाने आणि वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच, प्राण्यांवर त्वरित उपचार करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे प्राण्यांसाठी रुग्णवाहिका असणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरणार असल्याचे जानकर यांनी विधानसभेत सांगितले. 

Web Title: bullock cart racing open race way