दुधाचा खरेदी दर रुपयाने कमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

सोलापूर - सोलापूर जिल्हा दूध संघाने गायीच्या दुधाचा खरेदी दर एक रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. निश्‍चित गुणप्रतीच्या दुधाला यापूर्वी प्रतिलिटर 23 रुपये दिले जात होते. त्यामध्ये एक रुपयाची घट करून तो दर एक सप्टेंबरपासून 22 रुपये केला आहे. केवळ 21 दिवसांमध्येच संघाने दराविषयीचा हा निर्णय बदलला आहे. याचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

जिल्हा दूध संघाची वार्षिक सभा संघाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झाली होती. त्या सभेपूर्वी म्हणजेच 11 ऑगस्टला संघाने दुधाचा खरेदी दर 22 रुपयांवरून 23 रुपये प्रतिलिटर केला होता. सरकारी दरापेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक रुपया वाढीव देण्याचा निर्णय संघाने घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. मात्र ही सर्वसाधारण सभा संपून एक आठवड्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच संघाने शेतकऱ्यांच्या या आनंदावर विरजण घातले आहे.

गुणप्रत पूर्वीचा दर नवीन दर
3.5 फॅट व 8.5 एसएनएफ 23 रुपये प्रतिलिटर 22 रुपये प्रतिलिटर

संघाने 23 रुपये दर देण्याचा चांगला निर्णय घेतला होता, त्यामुळे आम्हाला फायदा होत होता; पण पुन्हा दर कमी केल्याने अडचणीत भरच पडणार आहे.
लक्ष्मण भोसले, दूध उत्पादक शेतकरी.

Web Title: Buy low milk prices per liter