गोकाक, अथणी, कागवाड पोट निवडणुका कोण ठरणार सरस ?

नामदेव पंढरी 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर गोकाक, अथणी व कागवाड विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुका होत आहेत.

हत्तरगी  (बेळगाव) :  आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर गोकाक, अथणी व कागवाड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका होत आहेत. बेळगाव जिल्ह्याचा 1967 पासूनचा राजकीय इतिहास पाहिला असता उमेश कत्ती, भालचंद्र जारकीहोळी, राजू कागे व गणेश हुक्केरी यांनी पोटनिवडणुकीद्वारे राजकारणात प्रवेश केला आहे. 

हुक्केरी विधानसभा मतदार संघात दोन वेळा पोटनिवडणुका झाल्या आहेत. या दोन्ही निवडणुकीत उमेश कत्ती हे वेगवेगळ्या पक्षातून निवडून आले आहेत. 1985 मध्ये जनता पक्षाचे प्रभावी नेते विश्‍वनाथ मलापा कत्ती हे कॉंग्रेसचे बी. जी. पाटील यांच्या विरुध्द निवडून आले. त्यांच्या निधनानंतर जनता पक्षातर्फे विश्‍वनाथ कत्ती यांचे ज्येष्ठ पुत्र उमेश कत्ती यांनी कॉंग्रेसचे एस. एस. महाजनशेट्टी यांच्या विरुध्द निवडणूक जिंकली.

प्रभावी राजकारणी म्हणून  राज्यात उमेश कत्ती

1989-1994 मध्ये जनता दल मधून निवडून आले. 1999 मध्ये संयुक्त जनता दल उमेश कत्ती यांनी संयुक्त जनता दलमधून कॉंग्रेस प्रवेश केला. भाजपचे शशीकांत नाईक यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर धजद मधून 2008 मध्ये निवडून आले. यानंतर ऑपरेशन कमल झाले. भाजप मध्ये केला. यावेळी पोटनिवडणुकीत उमेश निवडून आले. 2013 व 2019 मध्ये भाजपतर्फे निवडून आले. यांचा पोटनिवडणुकीत राजकारणात प्रवेश झाला. प्रभावी राजकारणी म्हणून राज्यात त्यांची ख्याती आहे. मतदार संघात त्यांची चांगली पकड आहे. 

भालचंद्र जारकीहोळींचा भाजपमध्ये प्रवेश

बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघात बापूसाहेब महांगावकर (एमएएस) हे माजी महापौर सिध्दनगौडा पाटील विरुद्द निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर एमएएसचे अर्जुन हिशोबकर निवडून आले. आरभावी विधानसभा मतादर संघात 2008 मध्ये धजदचे भालचंद्र जारकीहोळी यांनी भाजपचे विवेक पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर भालचंद्र जारकीहोळी ऑपरेशन कमळद्वारे भालचंद्र जारकीहोळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर पक्षाची अदलाबदल होऊन भालचंद्र जारकीहोळी (भाजप) विरुध्द विवेक पाटील (कॉंग्रेस) यांच्यात लढत होऊन भालचंद्र जारकीहोळी निवडून आले. 

गणेश हुक्केरी कॉंग्रेस पक्षातून विधानसभेत प्रवेश

चिक्कोडी - सदलगा विधानसभा मतदार संघात एकदा पोटनिवडणूक झाली. 2013 मध्ये प्रकाश हुक्केरी निवडून आले. त्यांचेच सरकार सत्तेवर आल्यानंतर ते मंत्री झाले. त्यानंतर लोकसभा निवडून आली. कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींनी प्रकाश हुक्केर यांना चिक्कोडी लोकसभा मतदार संघाची कॉंग्रेस उमेदवारी म्हणून प्रकाश हुक्केरी यांना दिली. त्यांना आमदारपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याचवर्षी त्यांचे सुपूत्र गणेश हुक्केरी यांनी भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला.

2019 मध्ये लोकसभा मतदार संघातून पराभव 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश हुक्केर यांनी विजय मिळविला. 2019 च्या विधानसभा मतदार संघात प्रकाश हुक्केरी यांचे पुत्र गणेश हुक्केरी निवडून आले. मात्र प्रकाश हुक्केरी यांना 2019 मध्ये लोकसभा मतदार संघात भाजपचे आण्णासाहेब जोल्ले यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. 

राजू कागे यांनी भाजपतर्फे हॅट्‌ट्रीक साधली

कागवाड विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांदा पोट निवडणूक होत आहे. 1999 मध्ये भरमगौडा (राजू) कागे यांनी कॉंग्रेसतर्फे दुसऱ्यांदा पोट निवडणूक लढवित आहेत. राजू कागे यांनी 1999 मध्ये अपक्ष उमेदवार निवडणूक लढविली आणि त्यांना कॉंग्रेसचे पासगौडा पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यांच्या निधनानंतर 2000 मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत कॉंग्रेसच्या विजय पासगौडा पाटील यांच्या विरुध्द संयुक्त जनता दलाचे राजू कागे यांनी निवडणूक जिंकली. यानंतर राजू कागे यांनी भाजपतर्फे हॅट्‌ट्रीक साधली. 

कुडची  विधानसभा मतदार संघात पोट निवडणूक नाही

रामदुर्ग, सवदत्ती, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर, बेळगाव दक्षिण (उचगाव) बेळगाव ग्रामीण, निपाणी, रायबाग, यमकनमर्डी व कुडची या विधानसभा मतदार संघात आज पर्यंत पोट निवडणूक झालेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bye Election Of Gokak Athani Kagwad In Belgaum District