
Kasba,Chinchwad bypoll : एक्झिट पोल आला! चिंचवडमध्ये जगताप तर कसब्यात...
पुणे - पुण्यातील कसबा पेठ निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला होता. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी पैसे वाटपाचा आरोप करत उपोषण पुकारलं होतं. त्यातच आता एक्झिट पोल आला आहे.
द स्ट्रेलेमा संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार चिचवडमध्ये भाजपला जागा राखण्यात यश मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला १ लाख ५ हजार ३५४ मते मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना ९३ हजार आणि राहुल कलाटे यांना ६० हजार १७३ मते मिळण्याचा अंदाज आहे.
दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठमध्ये रवींद्र धंगेकर विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून धंगेकर यांना ७४ हजार ४२८ मते मिळू शकतात. तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ५९ हजार ३५१ मते मिळण्याचा अंदाज आहे.