परीक्षेची तारीख बदला; विद्यार्थी ठोठावणार हायकोर्टचा दरवाजा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

आमदार रोहित पावार यांनी यासंदर्भात मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाला पत्र पाठवून परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे.

पुणे : मुंबई महापालिकेच्या आणि जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची परीक्षा एकाच दिवशी 25 नोव्हेंबर रोजी होत आहे. त्याचा फटका तब्बल 25 हजार उमेदवारांना बसणार असल्याने परीक्षेची तारीख बदलावी यासाठी उमेदवारांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात मंगळवारी (ता.19) याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'एकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले' या मथळ्याखाली 'सकाळ'ने उमेदवारांच्या समस्येला वाचा फोडली. मुंबई महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 243 पदांसाठी 25 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षेची तारीख ऑक्‍टोबर महिन्यात जाहीर केली होती. तर जलसंपदा विभागाने हीच 500 पदे भरण्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी हीच तारीख जाहीर केली. या दोन्ही परीक्षा देणारे राज्यात सुमारे 25 हजार उमेदवार आहेत, पण आता त्यांना कोणतीतरी एकच परीक्षा द्यावी लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

- मटनाचा वाढलाय भाव, खिशाला परवडेना राव!

उमेदवारांनी पाठविलेल्या इमेल आणि त्यांच्या फोनला अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर येत नसल्याने राज्यातील 2 हजार पेक्षा जास्त उमेदवारांनी एकत्र येऊन याविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय केला. त्यासाठी त्यांनी निधीही जमा केला आहे.

- प्रवाशांसाठी खूशखबर! आळंदी यात्रेसाठी पीएमपीचे 211 बसचे नियोजन

सोमवारी ही याचिका दाखल करण्यात येणार होती, पण दुपारपर्यंत कागदपत्र जमा न झाल्याने मंगळवारी याचीका दाखल केली जाणार आहे. प्रेमकुमार दराडे, श्रीराम बेजनकीवार, राज दराडे, दीपक माळे, खुश जाधव यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली जाणार आहे.

- पुणे : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!

आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांच्या पाठीशी!

दरम्यान, आमदार रोहित पावार यांनी यासंदर्भात मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाला पत्र पाठवून परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. तसेच पाटबंधारे विभागाच्या राज्यभरती निवड समितीचे सचिव बा.ज. गाडे यांना वारंवार फोन केले, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates will file a petition in Aurangabad High Court for change the date of examination